Monday, 18 January 2021

कॉम्प्युटरमध्ये टास्कबार कसे लपवायचे?



नमस्कार मित्रांनो, 
        कॉम्प्युटर मधील टास्कबार म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे काय ? आणि हे काय काम करते? 
        कदाचित आपल्याला माहित असेलही, नसेल माहित तर मी आपल्याला सांगेनच. 
        टास्कबार कॉम्प्युटरमध्ये  डेस्कटॉपच्या खालील बाजूला असते. ज्यावर Start बटण असते, तारीख आणि वेळ असते, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि Sound Icon देखील असते आणि बरेच काही.
        आपण हे टास्कबार लपवू इच्छित असल्यास आपण ते अगदी सहजपणे लपवू शकता. डीफॉल्टनुसार, टास्कबार खालील बाजूला दिसून येतो. आपण हा टास्कबार डावीकडे, उजवीकडे, वर, खाली देखील करू शकता.

चला तर मग आपण टास्कबारची ही युक्ती शिकूया.
        १. सर्वप्रथम आपल्याला  डेस्कटॉपच्या खालील बाजूला असलेल्या टास्कबारवर
            Right क्लिक करावे लागेल.
        २. त्यानंतर Properties वर क्लिक करा.



        ३.आता तुम्ही “Taskbar location on Screen”  या पर्यायावर क्लिक करा, क्लिक केल्यावर
           तुम्हांला Bottom, Left, Right, Top हे चार पर्याय दिसतील.
        ४.आपण ज्या ठिकाणी टास्कबार ठेवू इच्छित आहात त्याठिकाणी ते ठेवू शकता. जसे की
           आपल्याला टास्कबार डाव्या बाजूला ठेवायचा असेल तर “Left” वर क्लिक करा आणि नंतर
           OK वर क्लिक करा.
        ५.जर तुम्हाला टास्कबारचे आयकॉन small ठेवायचे असेल तर आपल्याला “Small” चिन्हावर
           क्लिक करून Ok करावे लागेल.
        ६.जर आपल्याला टास्कबार लपवायचा असेल तर आपणास "Auto Hide Taskbar" वर क्लिक 
           करून  Ok  करावे लागेल.

                 

आपणास ही माहिती कशी वाटली? कृपया कमेंट करुन आम्हाला सांगा आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावरील आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून प्रत्येकास या माहितीबद्दल जाणून घेता येईल. आपणास कोणताही टॉपिक समजून घेण्यात काही समस्या येत असल्यास खाली कमेंट करून प्रश्न विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

1 comment:

उज्ज्वल करिअर कन्सल्टन्सी | करिअर मार्गदर्शन आणि जॉब प्लेसमेंट उज्ज्वल करिअर मुख्यपृष्ठ आमच्याविषयी ...