Wednesday, 27 January 2021

कॉम्प्युटरमध्ये माऊसने कीबोर्ड कसा ऑपरेट करायचा ?



नमस्कार मित्रांनो !
मी आहे  तुमचा मित्र सचिन कदम,
माझ्या या ब्लॉगवर मी तुमचे खूप खूप स्वागत करतो.

मित्रांनो, कॉम्प्युटरवर बर्‍याच वेळा काम करीत असताना आपला कीबोर्ड अचानक खराब होतो किंवा कीबोर्डमधील काही बटणे काम करीत नाहीत, तर मग अशा परिस्थितीत आपण आपले काम थांबवायचे  का ? नाही ना! तर मग आपल्याला आपले काम थांबविण्याची किंवा जेव्हा आपण दुसरा / नवीन कीबोर्ड आणल्यावर राहिलेले काम करू असे सांगून आपले काम पुढे ढकलण्याची अजिबात गरज नाही. 
कारण तुम्ही एक म्हण ऐकली असेल "कल करे सो आज कर, आज करे सो अब !"  
या म्हणीनुसार आपले काम आत्ताच पूर्ण करायचे आहे, मग ते कसे ?  
तर मी तुम्हाला सांगणार आहे " कॉम्प्युटरमध्ये माऊसने कीबोर्ड कसा ऑपरेट करायचा ? " ही युक्ती.
चला तर मित्रांनो, ही युक्ती आपण शिकू या, अगदी सोप्या मार्गाने.




कॉम्प्युटरमध्ये माऊसने कीबोर्ड कसा ऑपरेट करायचा ?

1. सर्वात प्रथम Start button वर click करायचे.
2. त्यानंतर Search box मध्ये osk टाइप करायचे.     
3. त्यानंतर वर osk येते, त्या osk वर click करून open करायचे.     
4. झाले तर मग आपले काम, आपल्यासमोर स्क्रीनवर कीबोर्ड show होतो, आता आपण आपल्या Mouse ने click करून type करु शकता.

👉शिका आणि कमवा👈 

या योजनेअंतर्गत विद्यार्थी/विद्यार्थींनींना "कॉम्प्युटर टिचर" होण्याची सुवर्णसंधी. 

फॉर्म भरण्यासाठी येथे  क्लिक करा.



आपणास ही माहिती कशी वाटली? कृपया कमेंट करुन आम्हाला सांगा आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावरील आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून प्रत्येकास या माहितीबद्दल जाणून घेता येईल. आपणास कोणताही टॉपिक समजून घेण्यात काही समस्या येत असल्यास खाली कमेंट करून प्रश्न विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

No comments:

Post a Comment

उज्ज्वल करिअर कन्सल्टन्सी | करिअर मार्गदर्शन आणि जॉब प्लेसमेंट उज्ज्वल करिअर मुख्यपृष्ठ आमच्याविषयी ...