Tuesday, 15 December 2020

संगणक किंवा लॅपटॉपमध्ये न दिसणारे फोल्डर कसे तयार करावे?

संगणक किंवा लॅपटॉपमध्ये न दिसणारे फोल्डर कसे तयार करावे?

मित्रांनो, आज मी तुम्हाला संगणकात न दिसणारे फोल्डर कसे तयार करावे ते सांगेन. ही खूप जबरदस्त trick आहे. आपल्याकडे संगणक किंवा लॅपटॉप असल्यास, आपण या trick चा वापर करून आपले फोल्डर सहजपणे लपवू शकता आणि हे फोल्डर ज्या ठिकाणाहून लपवाल त्याच ठिकाणी असेल परंतु ते आपणास दिसणार नाही.

तर मित्रांनो, चला तर ही युक्ती आपण जाणून घेऊया.

संगणकात न दिसणारे फोल्डर कसे तयार करावे?
१. सर्वप्रथम आपण आपल्या डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर right क्लिकद्वारे  तयार करणे आवश्यक आहे, किंवा  आपण कीबोर्डवरून एकाच वेळी CTRL + SHIFT + N देखील दाबून फोल्डर तयार करू शकतो.
२. आता नवीन फोल्डरवर राइट-क्लिक करा आणि नंतर rename क्लिक करावे लागेल.
. आता नाव बदलताना, कीबोर्ड वरून Alt + 255 किंवा Alt + 160 टाइप करा आणि एंटर दाबा.
. आता आपले नाव नसलेले फोल्डर तयार झाले.
. आता त्याच फोल्डरवर right क्लिक करून properties वर क्लिक करा.
६. आता customize वर क्लिक करा.
. आता change icon वर क्लिक करा.


. आता तुम्हाला बरेच icon दिसतील.
९. आता येथून blank icon निवडावे लागेल.

१०. आता यानंतर OK वर क्लिक करा.
११. आता आपले फोल्डर यशस्वीरित्या hide झालेले आहे.


आपणास ही माहिती कशी वाटली? कृपया कमेंट करुन आम्हाला सांगा आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावरील आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून प्रत्येकास या माहितीबद्दल जाणून घेता येईल. आपणास कोणताही टॉपिक समजून घेण्यात काही समस्या येत असल्यास खाली कमेंट करून प्रश्न विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

No comments:

Post a Comment

उज्ज्वल करिअर कन्सल्टन्सी | करिअर मार्गदर्शन आणि जॉब प्लेसमेंट उज्ज्वल करिअर मुख्यपृष्ठ आमच्याविषयी ...